Ad will apear here
Next
मीरा निलाखे ‘सूर नवा ध्यास नवा’च्या अंतिम फेरीत
साखरपा : सध्या कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘सूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीर’ या गायनाच्या रिअॅलिटी शोमध्ये येथील कोंडगावची (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) नात मीरा राहुल निलाखे ही सहभागी झाली असून, या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे.   

सांगलीची सुकन्या असलेल्या मीरा हिची आई संपदा निलाखे (पूर्वाश्रमीच्या संपदा हळबे) यांचे कोंडगाव येथे माहेर आहे. तिचे आजी-आजोबा, मामा-मामी येथे वास्तव्यास असून, आपल्या नातीने रिअॅलिटी शोच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारल्याने ते आनंदित आहेत. हा शो सोमवार, मंगळवार आणि बुधवारी रात्री ९.३० वाजता प्रसारित केला जातो.

मीरा सध्या सांगली येथे दहावीत शिक्षण घेत असून, ती आठ वर्षांची असल्यापासून पराग जोशी यांच्याकडे शास्त्रीय आणि सुगम संगीताचे धडे गिरवत आहे. तिचे वडील राहुल निलाखे सांगलीतील प्रथितयश बांधकाम व्यावसायिक असून, तिची आई संपदा यांना गायनाची विशेष आवड आहे. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून शास्त्रीय संगीताचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. प्रारंभी त्यांचा रियाज सुरू असताना लहानगी मीराही त्यांच्या रियाजात सामील होत असे. हे बाळकडू घेत मोठी झालेल्या मीरामधील गुणवत्ता हेरत तिच्या आई-वडिलांनी तिला संगीत शिक्षक जोशी यांच्याकडे पाठविण्यास सुरुवात केली. गेली सात वर्षे ती संगीताचे शिक्षण घेत आहे.

काही महिन्यांपूर्वी ‘सूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीर’ रिअॅलिटी शोसाठी ऑडिशन सुरू होती. कोल्हापूर केंद्रावरून मीरा यात सहभागी झाली होती. यात तिची निवड झाली. महाराष्ट्रातील विविध केंद्रावरून निवडण्यात आलेल्या सुमारे सहा हजार मुलांची मुंबई येथे मेगा ऑडिशन घेण्यात आली. त्यातून ५५ मुलांची निवड करण्यात आली. या मुलांची मेगा ऑडिशन घेत २१ अंतिम स्पर्धक निवडण्यात आले. यात १३ मुले परीक्षकांमार्फत, तर स्टँड बाय घेऊन आठ मुले निवडण्यात आली. या २१ मुलांमध्ये ‘सूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीर’ हा किताब पटकाविण्यासाठी स्पर्धा सुरू झाली.

आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यात असून, या स्पर्धेत ‘टॉप सिक्स’ची नुकतीच निवड करण्यात आली. यातही मीराने आपल्या गायन कौशल्याने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले आहे. या स्पर्धेचा निकाल २४ डिसेंबर २०१८ रोजी लागेल.

‘१८ डिसेंबरपासून आपल्या आवडत्या स्पर्धकाला मतदान करता येणार असून, पश्चिम महाराष्ट्रातून एकमेव स्पर्धक आणि साखरप्याची नात असलेल्या मीराला मतदानरूपी आशीर्वाद भरभरून द्यावा आणि तिला या स्पर्धेची विजेती करावे,’ असे आवाहन संपदा आणि राहुल निलाखे यांसह हळबे परिवाराकडून करण्यात आले आहे.

(साखरपा येथे रामनवमीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात गाणे सादर करणाऱ्या मीरा निलाखेचा व्हिडिओ सोबत देत आहोत. )


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZQHBV
 खुप खुप सुंदर, खुप खुप शुभेच्छा.
 All the best Meera for the future!!!
 खूप छान तुला खूप खूप शुभेच्छा1
 khup sunder best of luck2
 Very nice Meera,
Congratulations.
Best wishes for final round .1
 Best wishes for final.
Your voice is very good.1
 Super se uper lay bhari khupch mst1
 We proud be be Sakharpa Kar

All The Best Meera2
 all the best Meera

we proud to be Sakharpa Kar1
 All the best Mira again again and your voice is very sweet1
 अशीच ऊत्तोम ऊत्तोम गरूड बरारी गे, आई वडीलाचे नाव लौकीक कर, माज्याकडुन खुप शुभेच्छा1
 .... very nice .....
...... Mast....
Similar Posts
‘अनुलोम’तर्फे स्वच्छता आणि दुरुस्ती अभियान साखरपा (रत्नागिरी) : अनुगामी लोकराज्य महाभियान (अनुलोम) आणि कोंडगाव येथील श्रीराम देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने कोंडगाव येथे स्मशानभूमी स्वच्छता आणि दुरुस्ती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी देवस्थानचे विश्वस्त आणि कोंडगावचे नूतन सरपंच बापूसाहेब शेट्ये, सदस्य मितेश गांधी आणि नेत्रा शिंदे उपस्थित होते
श्री दत्तसेवा पतसंस्थेमार्फत संपूर्ण कोंडगावात आर्सेनिकम अल्बमचे वाटप करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कोंडगाव (साखरपा, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील श्री दत्तसेवा पतसंस्थेमार्फत खबरदारीचा उपाय म्हणून आर्सेनिकम अल्बम ३० या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप संपूर्ण कोंडगावमध्ये विनामूल्य करण्यात येणार आहे.
कोंडगाव येथे अकौंटन्सीचे मोफत मार्गदर्शन वर्ग कोंडगाव (साखरपा) : येथील श्रीराम देवस्थान आणि रत्नागिरी येथील उज्ज्वला अकौंटन्सी क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी मे महिन्यात कोंडगाव श्रीराम मंदिरात कॉमर्स शाखेबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कोंडगावातील मोहरम : जुन्या काळातील सर्वधर्मसमभावाचे उदाहरण इथे एक विचार मनात येतो, ज्या अंगणातून श्री ग्रामदेवतेची पालखी थाटात नाचत येते, त्याच अंगणात मोहरमचा सणदेखील तेवढ्याच थाटात रंगत होता, हे त्या काळचे सर्वधर्मसमभावाचेच एक उदाहरण नव्हे का?

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language